गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यातील खडक नारळा येथे माझे गाव, आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
या ग्रामसभेत गावातील आरोग्यविषयक उपक्रमांना गती देण्यासाठी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्राम विकास अधिकारी हिरालाल सपकाळ यांनी अभियानाचे प्रस्ताविक सादर करत योजनेचे उद्दिष्ट व महत्त्व स्पष्ट केले. समुदाय विकास अधिकारी डॉ. अमोल कोलते यांनी गावात स्थापन करावयाच्या समित्या व सदस्य निवडीबाबत मार्गदर्शन केले. आशा सेविका सुनीता मुंजाळ यांनी अभियानाचा उद्देश
तसेच चतुःसूत्रीबाबत माहिती देत ग्रामस्थांना आरोग्याबाबत जागरूक केले.
तसेच ग्रामस्थांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली आणि विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
आशा स्वयंसेविका सीमाली थोरात यांनीसर्व ग्रामस्थ व समिती सदस्यांनीएकत्रितपणे काम करून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी सरपंच रंगुबाई मुंजाळ, ग्राम विकास अधिकारी हिरालाल सपकाळ, सीएचओ डॉ. अमोल कोलते, एमपीडब्ल्यू शेषरात भास्कर, आशा सेविका सुनीता मुंजाळ, सीमाली थोरात तसेच समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.















